सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा लोकशाहीसाठी धक्कादायक !

सोलापूर दि.३०(क.वृ.):- बाबरी मशीद निकालाबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने माकपचे राज्य सचिव ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांना पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले.
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील सर्व 32 आरोपींना लखनऊ येथील विशेष सीबीआय कोर्टाने दिलेला निकाल हा न्यायाला न्यायला गुंडाळल्यासारखे आहे. या निकालाला तब्बल अठ्ठावीस वर्षे लागली परंतु न्याय मिळाला नाही. फौजदारी कृत्याचे मार्गदर्शन करणारे घटनास्थळी उपस्थित असलेले भाजपा-व्हीएचपी-आरएसएसचे सर्व नेते मशिदी पाडण्याच्या षडयंत्र रचल्याच्या आरोपाखाली निष्पाप असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला ला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या निकालामध्ये विध्वंस हा कायद्याचा भंग केला आहे. आता, लखनौ कोर्टाने या गुन्ह्यातील मुख्य दोषींना दोषी ग्राह्य धरले नाही. या निकालामुळे घटनेने अस्तित्वात असलेली धर्मनिरपेक्ष-लोकशाही देश अशी भारताची प्रतिमा डागाळेल. या निर्णयाच्या विरोधात सीबीआयने त्वरित अपील करणे आवश्यक आहे.
0 Comments