Hot Posts

6/recent/ticker-posts

नवीन हत्तुरे वस्ती भाजीपाला मार्केट येथे स्ट्रीट लाइट उभारणीचे काम सुरू

नवीन हत्तुरे वस्ती भाजीपाला मार्केट येथे स्ट्रीट लाइट उभारणीचे काम सुरू

सोलापूर दि.३०(क.वृ.): नवीन हत्तुरे वस्ती भाजीपाला मार्केट येथे कै.सौ.रखमाबाई हत्तुरे मंगल कार्यालय रोड, वैष्णवी सिटी शेजारी (जुना कुमठा रोड)  या  ठिकाणी  लाइट सोय नसल्यामुळे भाजीपाला विक्रते व नागरिकांना, महिलांना प्रचंड त्रास होत होता. याकरिता जय हो कामगार संघटनाचे संस्थापक अध्यक्ष तथा परिवहन समितीचे माजी सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी मनपा आयुक्त पि. शिवशंकर व लाइट विभागाचे अधिकारी महादेव इंगळे साहेबांनाकडे जय हो कामगार संघटनेच्या वतीने विनंती केली होती. याची दखल घेऊन आज भाजीपाला मंडई रोड वर 18 स्ट्रीट लाइट  पोल स्मार्ट सिटी कंपनीच्या फंडातून उभारण्यात आले आहे. लाइटची सोय झाल्या मुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. 

स्मार्ट सिटी कंपनीचे सी.इ.ओ त्र्यंबक डेंगले पाटीलसाहेब, मनपा आयुक्त पी. शिवशंकर साहेब, मनपा लाइट विभागाचे महादेव इंगळे साहेब यांनी लाइटचा प्रश्न तात्काळ मार्गी लावल्यामुळे माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी आभार मानले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments