Hot Posts

6/recent/ticker-posts

गावोगावी घुम लागला "मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजेची" धुम गजर !

गावोगावी घुम लागला "मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजेची" धुम गजर !


तुळजापूर दि.३०(क.वृ.):- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या दरबारातुन मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ बुधवार दि.९ रोजी देवी दरबारातुन केला जाणार असुन या आंदोलनाचा जनजागृती साठी तालुक्यातील गावागावात मराठा  समाजातील युवा वर्ग जावुन सभा बैठका  घेवुध जनजागृती करीत असल्याने "मराठ्यांना आरक्षण मिळालेच" आरक्षण आमचा हक्काचे, नाही कुणाचा बापचे असा जयघोष गावोगावी घुमु लागला आहे.

सध्या जनजागृती दौरे तसेच पोस्टर बँनर गावोगावी झळकु लागले आहे. या जनजागृतीचे वैशिष्ट्ये म्हणून कुण्या ही नेत्याचे नाव पुढे येत नाही सकल मराठा समाज सध्या या आंदोलन माध्यमातून ऐकञित होत असल्याचे दिसुन येत आहे.

मराठा आरक्षणास न्यायालयाने  स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजात संताप  लाट पसरली असुन याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्रीतुळजाभवानी मातेच्या दरबारातुन मराठा आरक्षण आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ व ऐल्गार मराठ्यांचा जागर भवानीचा या कार्यक्रमाने करणार आहे. या तिसऱ्या पर्वाचा आंदोलना  मराठा समाजातील युवक मराठाक्रांतीमोर्चा च्या नेतृत्वाखाली युवक गावोगावी जावुन मराठा आरक्षण आंदोलन आपण का करीत आहे याची सविस्तर सखोल अभ्यासपुर्ण माहीती देवुन या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे.

विशेष म्हणजे या जनजागृती दौरा स गावोगावचा मराठा समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थितीत राहुन पाठींबा देत असल्याने हे आंदोलन लक्षवेधी ठरण्याचे संकेत मिळत आहे. सध्या सकल मराठा समाजाची युवा ब्रिग्रेडच्या तोफा अभ्यासपुर्ण भाषणाने धडाढत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments