Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रणिती शिंदे व सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रणिती शिंदे व सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन


जास्तीत जास्त नागरीकांनी रक्तदान व प्लाझ्मा दान करण्यासाठी आ.प्रणिती शिंदे यांचे आवाहन

सोलापूर दि.२९(क.वृ.): सद्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहरातील विविध रक्तपेढींमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यासंदर्भात श्री छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांच्यावतीने आमदार प्रणिती शिंदे यांना रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात यावे याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रणिती शिंदे व सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यावतीने बुधवार, दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत काँग्रेस भवन, सोलापूर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. 

त्यामध्ये सोलापूर शहरातील विविध संघटना, संस्थेमधील कर्मचारी, सदस्य, विद्यार्थी व नागरीकांनी मोठया प्रमाणात रक्तदान करून या कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अपातकालीन परिस्थिती मध्ये रुग्णांना जिवदान मिळण्यास मदत करावी व तसेच ज्या नागरीकांना कोरोनाची लागण होवून त्यामधून पूर्णत: बरे झालेले आहेत अशा नागरीकांनी प्लाझ्मा दान करावे असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे व सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यावतीने करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक माहितीकरीता 9422460777, 9730160219 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Reactions

Post a Comment

0 Comments