राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रणिती शिंदे व सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यावतीने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबीरास प्रचंड प्रतिसाद


सोलापूर दि.३०(क.वृ.): सद्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहरातील विविध रक्तपेढींमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यासंदर्भात श्री छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांच्यावतीने आमदार प्रणिती शिंदे यांना रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात यावे याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रणिती शिंदे व सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यावतीने बुधवार, दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत काँग्रेस भवन, सोलापूर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक चेतन नरोटे, रियाज हुंडेकरी, तौफीक हत्तूरे, विनोद भोसले, नगरसेविका वौष्णवी करगुळे, फिरदोस पटेल, सुनिता रोटे, अनुराधा काटकर, संजय हेमगड्डी, संजय कोळी, माणिकसिंग मौनावाले, देवेंद्र भंडारे, शौकत पठाण उपस्थित होते.
या शिबीरामध्ये सोलापूर शहरातील विविध संघटना, संस्थेमधील कर्मचारी, सदस्य, विद्यार्थी व नागरीकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेवून रक्तदान केले. यामुळे कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अपातकालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना जिवदान मिळण्याकरीता मदत होईल.
या शिबीरामध्ये जवळपास 120 युवकांनी रक्तदान केले. या शिबीरामध्ये ज्या युवकांनी रक्तदान केले त्यांना भेटवस्तू देवून त्यांचा सन्मान करण्यात आले. यावेळी डॉ. सोनवणे, डॉ. माने व सहकारी तसेच बाबा करगुळे, गणेश डोंगरे, सौपन शेख, समाधान हाके, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, सुभाष वाघमारे, प्रियंका डोंगरे, श्रध्दा हुल्लेनवरू, प्रतिक शिंदे, दत्तात्रय नामकर, श्रीधर काटकर, योगेश मार्गम आदी. बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments