अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खाटांच्या उपलब्धतेसाठी समिती स्थापन जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती

सोलापूर, दि.१८(क.वृ.): सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना विषाणूने बाधित रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये खाटांची (बेड) संख्या कमी पडू नये, त्यांना त्वरित बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
ही समिती जिल्ह्यातील खाजगी आणि शासकीय रूग्णालयातील खाटांच्या संख्येचे नियोजन करेल. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचे समन्वय व तंतोतत वापर करून रूग्णांना बेड देण्यासाठी ही समिती प्रयत्नशील राहील, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.
समितीमध्ये अध्यक्ष म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव (9922601133) तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदीप ढेले (9423075732) सदस्य सचिव असतील. सदस्य म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार (9175420566), महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.शितल जाधव (9403694080), वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे (9850245333) असतील.
समितीची कार्ये :-
- सोलापूर शहर, ग्रामीण भागामध्ये अतिरिक्त आयसीयू/ऑक्सिजन बेड निर्माण करणेची उपाययोजना सूचविणे.
- शासकीय रुग्णालयामध्ये (सिव्हील हॉस्पीटल, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये) आयसीयू/ शासकीय बेड तयार करण्याबाबत शक्यता पडताळणे.
- आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री निश्चित करणे आणि खरेदीबाबत सूचना करणे
- शासकीय रुग्णालयामध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत उपाययोजना करणे.
- बाधित रुग्णांच्या, नातेवाईकांच्या अडचणी/समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करावे.
0 Comments