Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना पार्श्वभूमीवर मंदीर लवकर सुरू होण्याची शक्यता कमी असल्याने भक्त महाध्दार समोर करु लागले धार्मिक विधी !

कोरोना पार्श्वभूमीवर मंदीर लवकर सुरू होण्याची शक्यता कमी असल्याने भक्त महाध्दार समोर करु लागले धार्मिक विधी !


कोरोनाचा फटका मंदीरात धार्मिक विधी करण्याला!
परप्रांतीय भाविकांचा संखेत वाढ!
भवानी रोडवर लागल्या भाविकांचा वाहनांचा रांगा !
लाखो भाविक मंदीर भक्तांना खुले करण्याचा प्रतिक्षेत !

तुळजापूर दि.१८(क.वृ.):- देशासह राज्यात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर भयभीत झालेले राज्यासह परराज्यातील भाविक श्रीतुळजाभवानी मंदीर बंद असले तरीही तिर्थक्षेञी येवुन मंदीर परिसरात येवुन विविध देवीचे कुलधर्म कुलाचार करुन कोरोना पासुन मुक्त ठेव बरे असे साकडे घालत आहेत.

गेली सहा महिन्या पासुन श्रीतुळजाभवानी मंदीर बंद असल्याने रखडलेले धार्मिक विधी भाविक मंदीर भाविकांन साठी लवकर खुले होण्याची शक्यता कमी दिसत असल्याने सध्या पीतृपक्ष पंधरवाडा असताना ही भाविक जावळ काढणे दंडवत  घालणे माळपरडी घेणे खणनारळाने ओटी भरणे भोगी करणे अदि धार्मिक विधी  महाध्दार समोरील रस्त्यावर करुन कुलधर्म कुलाचार केल्याचे समाधान मानुन गावी जात आहेत. 

विशेष म्हणजे हा धार्मिक वृत्तीचा भाविक खाजगी वाहनांनी येवुन लगेच पुजाअर्चा करुन गावी जात आहे. सध्या भाविक दंडवत भवानी  रस्त्यावरुन   घालत  ते मंदीरा समोर येत असुन महाध्दार साष्टांग दंडवत घालुन देवीचरणी दंडवत विधी पुर्ण करीत आहेत.

अनेकांना नवसपुर्ती पोटी झालेल्या अनेक बालकांचे जावळ वाढल्यामुळे अनेक भाविक जावळ काढण्यासाठी येवुन जावळ काढण्याचा विधी रस्त्यावर करीत आहेत.

आंतरराज्य वाहतूक सुरु झाल्याने सध्या कर्नाटक आंध्र तेलगंणा मध्यप्रदेश गुजरात या परराज्यासह पुणे  सोलापूर बीड लातूर सह राज्यातील अनेक जिल्हयातुन भाविक तिर्थक्षेञी येवुन महाध्दार परिसरात कुलधर्म कुलाचार करीत आहेत, तसेच मोठ्या संखेने भाविक  महाध्दार समोर येवुन देवीचरणी नतमस्तक होवुन देवीदर्शन घडल्याचे समाधान मानून गावी जात आहे. या भाविकात शहरी व ग्रामीण भाविकांचा समावेश आहे.

लाखो भाविक मंदीर खुले होण्याच्या प्रतिक्षेत!
देशासह राज्यातील लाखोचा संखेने भाविक आपआपल्या पारंपारिक पुजारी वृंदा कडे मंदीर कधी खुले होणार अशी विचारणा मोबाईल  लाखोचा संखेने  करीत असुन पुजारीवृंद माञ शाषण आदेश आल्यावर मंदीर खुले झाल्यावर कळवु असे सांगत आहे
Reactions

Post a Comment

0 Comments