उतरा नक्षत्राच्या पावसाने केला सोयाबीन कांद्याचा वांदा!


हजारो हेक्टर वरील सोयाबीन कांद्याचे मोठे नुकसान !
तुळजापूर दि.१८(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यात बुधवारी सर्वदूर झालेल्या उत्तरा नक्षञाचा पावसाने काढणीस आलेले सोयाबीन लागण केलेला कांदा याचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटका बसला. तुळजापूर तालुक्यात पावसाची सरासरी 834.5 मिमि असुन गुरुवार दि.17 रोजी सकाळ पर्यत आजपर्यत 565 -मिमि म्हणजे 73.6-टक्के पाऊस झाला आहे.
चोवीस तासात तालुक्यात सर्वाधिक शंभर मिमि पाऊस झाला आहे. तुळजापूर तालुक्यास बुधवार दि16रोजी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने चांगले च झोडपून काढले. या पावसामुळे अक्षरशा शेतींना तळ्याचे स्वरुप आले काढणीस आलेला सोयाबीन पाण्यात बुडुन गेले लावण केलेला कांदा ही यात बुडुन गेला.
शेतकरी वर्गाने अक्षरशा शेतातील पाणी काढुन घेण्यासाठी रानातील बांध फोडले यात काढणीस आलेले सोयाबीन पाण्यात गेल्याने आता दहा दिवस तर वाफसा होणे कठीणअसल्याने सोयाबीन झाडावर टिकेल का नाही याची चिंता आता शेतकऱ्यांना लागली आहे.
तुळजापूर पंचक्रोषीत असणाऱ्या आपसिंगा कामठा कात्री तडवळा मोर्डा काक्रंबा या गावातील खरीप पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. या झालेल्या धुवादार पावसामुळे नदी नाले ओढे भरभरुन वाहले तुळजापूर खुर्द परिसरात असलेल्या ओढ्याला पाणी आले या ओढ्यावरील पुलावरुन बुधवारी सांयकाळी सहा वाजेपर्यंत पाणी दीड फुट चा वर पर्यत वाहल्याने या मार्गावरील केशगाव धारुर मोर्डा कडे जाणारी व येथुन तुळजापूर कडे येणारी वाहतुक सांयकाळ पर्यत बंद होती. पाणी पुलावरुन ओसरल्यानंतर वाहतूक सुरु झाली या झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचक्रोषीतील सखल भागात पाणीच पाणी झाले होते तर ओढे प्रथमच दुथडी भरुन वाहत होते. बुधवार दुपारी साडेबारा वाजता मुसळधार पावसास आरंभ झाला तो दोन वाजेपर्यंत मुक्त पणे बरसला नंतर रात्री ही पावसाचा सरीवर सरी कोसळल्या. या झालेल्या पावसामुळै तलावांन मध्ये पाणीसाठ्यास होण्यास आरंभ झाला आहे.
0 Comments