Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटेना कोरोनाची बाधा ; संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे केले आवाहन

 कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटेना कोरोनाची बाधा ; संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे केले आवाहन

सांगोला दि.१८(क.वृ.): सोलापूर जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे यांना कोरोनाची लागण झाली असून, माझी तब्येत ठीक आणि उत्तम असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे ही त्यांनी जनतेला सांगितले आहे.

पुढे ते म्हणाले की,कोरोनाच्या या संक्रमणकाळात प्रशासनासोबत काम करने, आढावा घेणे अशी कामे करीत असताना पुरेपूर काळजी घेत होतो.पण या सर्वच काळात अनेकांशी संपर्क येत होता,पण आज मी माझी कोविद-19 ची टेस्ट केली असता आज मी कोरोना पॉसिटीव्ह असल्याचा रिपोर्ट आला.

त्यामुळे त्यांनी सर्व नागरिकांना विनंती केली आहे की ,आपण जास्त काळजी करू नये यातून लवकरात लवकर बरा होईन. या काळातही मी सर्व आढावा घेत राहीन. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन आपली टेस्ट करून घ्यावी.

Reactions

Post a Comment

0 Comments