Hot Posts

6/recent/ticker-posts

सभापती राणीताई कोळवले यांनी कमलापूर कोविड सेंटरला भेट देवून केली कोरोनाग्रस्तांची विचारपूस

सभापती राणीताई कोळवले यांनी कमलापूर कोविड सेंटरला भेट देवून केली कोरोनाग्रस्तांची विचारपूस

सांगोला(जगन्नाथ साठे)दि.१८(क.वृ.): सांगोला पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष सभापती राणीताई कोळवले यांनी कोविड सेंटर कमलापूरला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णांशी सोशल डिस्टन्स ठेवत अडचणी जाणून घेतल्या आणि कोरोना च्या काळात योग्य ती खबरदारी  घेण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी उपस्थित कोरोनाबाधितांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. 

कोरोनाने खचून व घाबरून न जाता धीराने या रोगाचा सामना केला पाहिजे असा सल्ला दिला. यावेळी त्यांच्यासमवेत सांगोला पंचायत समितीचे प्र.तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप देवकते, आरोग्य विभागाचे  कुंडलिक आलदर,आदि मान्यवर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments