Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोनाच्या काळात आरोग्याचा मूलमंत्र देणारा खरा योद्धा - कुंडलिक आलदर

कोरोनाच्या काळात आरोग्याचा मूलमंत्र देणारा खरा योद्धा - कुंडलिक आलदर


सांगोला दि.२६(क.वृ.): कोरोनाने हैराण झालेल्या सांगोला शहर आणि तालुक्यातील नागरिकांना आरोग्यदायी डोस देणाऱ्या मोजक्या लोकांत अग्रेसर नाव घेतले जाते, ते म्हणजे कोळा (कराडवाडी) ता. सांगोला या गावातील कुंडलिक सावळा आलदर यांचे जन्मभूमी आणि कर्मभूमी ठरलेल्या कोळा पंचक्रोशीत कुंडलिक आलदर यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील सर्वच लोकांशी सलोख्याचे संबंध आहेत. याच संबंधामुळे लहानापासून प्रौढापर्यंत कोणत्याही कार्यात त्यातल्या त्यात आरोग्याच्या बाबतीत कोणतीही अडचण आली तर 'आपला माणूस' म्हणून कुंडलिक आलदर यांची आठवण काढली जाते,या सर्व कार्यामुळेच आजच्या महामारीच्या आणि कोरोनाच्या काळात अनेक लोकांचे ते जीवनसारथी ठरले आहेत,त्यामुळे ते खऱ्या अर्थाने 'कोरोनायोद्धा' ठरले आहेत.

पंचायत समिती सांगोला येथील आरोग्य विभागात ते 2009 पासून  तालुका लेखा व्यवस्थापक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावीत आहेत,कोळा येथे एक हजार महिलांचे संघटन करून त्यांनी धनलक्ष्मी महिला पतसंस्थेचे स्थापना करून महिलांना आर्थिक सक्षमता मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. या पतसंस्थेच्या चेअरमनपदी त्यांच्या धर्मपत्नी प्रियंका आलदर (B.Com) धुरा सांभाळत आहेत.या पतसंस्थेच्या माध्यमातून ही कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या महाभयंकर रोगातही ते लोकांना या रोगापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सूचनाच देत नाहीत, तर अंमलात आणण्यासाठी ते प्रयत्न करतात.आजच्या काळात लोकांनी मास्क वापरला पाहिजे,सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, सोशल डिस्टन्सचा वापर केला पाहिजे, या बरोबरच वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापरही खुबीने करतात.या सर्व कार्यामुळे आज त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुळातच सामाजिक कार्याची आवड त्यांना त्याचे आई यशोदा (मा जी ग्राम पंचायत सदस्य आणि वडील सावळा आलदर (संचालक विकास सेवा सोसायटी कराडवाडी) यांच्याकडून मिळाला.म्हणून तर आरोग्यसेवा देणाऱ्या आणि कंत्राटी पदावर सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या संघटनेचे राज्याचे विभागीय अध्यक्ष(पुणे विभाग) पद हे तितक्याच ताकदीने सांभाळआहेत.कोरोनाच्या काळात लोकांची जनजागृती करण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न समाजासाठी आदर्शवत आहेत.कोळा क्रूषि अर्बन सहकारी बॅँकेचे चेअरमन आप्पासाहेब सरगर,विजय माळी, तानाजी सरगर, सदाशिव आलदर, या मान्यवरांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी आवर्जून कुंडलिक आलदर यांचे कौतुक केले.आणि केवळ कुंडलिक आलदर यांच्या प्रेरणेने आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आमची कोरोनाची भीती गेल्याची भावना त्यांनी कुंडलिक आलदर यांच्या सत्काराप्रसंगी व्यक्त केल्या.

आज कोरोनाची प्रत्येकाच्या मनात भीती आहे,कोरोनाने जिवाभावाचा साथीदार कै. आनंदा सरगर (मनेजर) गेल्याची भावना व्यक्त करून यापुढील काळात तरी कोरोनामुळे आपल्या हक्काची आणि जिवाभावाची माणसे कोरोनाला बळी पडू नये,यासाठी प्रयत्नशील आहेत. लवकरच आपण महाभयंकर रोगातून बाहेर पडू असा आत्मविश्वास कुंडलिक आलदर यांनी व्यक्त केलाआहे.माजी आमदार डॉ गणपतराव देशमुख, युवा नेते डॉ बाबासाहेब देशमुख, डॉ अनिकेत देशमुख, सभापती राणीताई कोळवले, जि प सदस्य सचिन देशमुख, गटविकास अधिकारी संतोष राऊत,तालुकाआरोग्य अधिकारी सीमा दोडमणी,डॉ पियुष साळुंखे पाटील,डॉ संदीप देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने कार्य चालू ठेवणार असल्याचे कुंडलिक आलदर यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments