सांगोला तहसील कार्यालय येथे धनगर समाज्याचे वतीने 'ढोल बजाओ सरकार जगाओ' आंदोलन संपन्न

सांगोला दि.२५(क.वृ.):- शुक्रवार दि.२५ सप्टेंबर रोजी सांगोला तहसील कार्यालय, सांगोला येथे सकल धनगर समाज यांच्यावतीने धनगर समाज्याच्या एस.टी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी 'ढोल बजाओ सरकार जगाओ' आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन हे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात व खेडोपाड्यात करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून सांगोला तहसील कार्यालय येथे धनगर समाज बांधव यांच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलन प्रसंगी उल्हास धायगुडे यांनी धनगर समाज्याला शासनाने आरक्षण द्यावे अन्यथा भविष्यात उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला देण्यात आला. त्यानंतर बाबू गावडे यांनी आरक्षण नाही दिल्यास भविष्यात शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील व आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे सांगितले.
0 Comments