सर्वांना मदत करत ‘लोकमंगल’ने सहकाराची भूमिका सार्थक केली : आ. देशमुख

लोकमंगल नागरी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात
सोलापूर दि.६(क.वृ.): जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक लोकमंगल समूहाशी जोडला गेला पाहिजे. आगामी काळात लोकमंगल पतसंस्था प्रत्येक गावागावात पोहोचली पाहिजे. पतसंस्थेने लॉकडाऊन काळामध्ये व्यवसाय तुमचा आधार आमचा या पार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकातील 400 व्यवसायिकांना कर्ज स्वरूपात मदतीचा हात देऊन खर्या अर्थाने सहकाराची भूमिका सार्थक केल्याचे प्रतिपादन यावेळी लोकमंगल समूहाचे संस्थापक आ. सुभाष देशमुख यांनी केले.
लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेची 18 वी वार्षिक सर्वसाधारण रविवारी लोकमंगल मल्टीस्टेट, शेळगी येथ आ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी पतसंस्थेच्या सभासंदांना 14 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे यंदा वार्षिक सर्वसाधारण सभा मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत घेण्यात आली. प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन गुरणा तेली यांनी केले. अहवाल वाचन सरव्यवस्थापिका अलका देवडकर यांनी केले. यावेळी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी पाटील, चेअरमन गुरण्णा तेली, सरव्यवस्थापिका अलका देवडकर, संचालक हरिश्चंद्र गवळी, मनीष देशमुख, शहाजी साठे, समाधान पाटील, फय्याज मुलानी, युवराज गायकवाड, सिद्राम देवकुळे, रेवनप्पा व्हनमाने, भिमाशंकर कलशेट्टी, पतसंस्थेचे चार्टर्ड अकाउंटंट दीपक दरगड, केकडे वकील, अविनाश महागावकर आदी उपस्थित होते. युवराज गायकवाड यांनी आभार मानले.
0 Comments