Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा


मुंबई, दि.५(क.वृ.): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त  अभिवादन केले आहे.

राष्ट्र उभारणीत शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजच्या या आव्हानात्मक कोविड विषाणू प्रतिबंधक लढ्यातही शिक्षक बंधू-भगिनींचे योगदान आहे. शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरूच राहावे यासाठी आपण सर्वचजण प्रयत्नशील आहोत.  या प्रयत्नांना अनेक शिक्षक आपल्या धडपडीने बळ देत आहेत. यातूनच आपण आव्हानांवर मात करू, या विश्वासासह मुख्यमंत्र्यांनी शिक्षक दिनाच्या  शुभेच्छा दिल्या आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments