महर्षी करंडक ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा...

खुल्या गटात जगताप, कवडे तर शालेय गटात देशमुख, परळे प्रथम
अकलूज दि.८(क.वृ.): महर्षी करंडक राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात प्रसाद जगताप (धुळे) व रोहन कवडे (पुणे) यांनी तर शालेय गटात संचित देशमुख (सोलापुर) व प्रसाद परळे (सातारा) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, मराठी, हिंदी व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोनामुळे या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने झाल्या. त्याचा निकाल ऑनलाईन देण्यात आला.
शालेय गटात प्रथम क्रमांक संचित देशमुख(सोलापुर), प्रसाद परळे (सातारा), व्दितीय क्रमांक आर्या शिंदे (अकलूज), सिध्दी घाडगे (रायगड), अनुभव ठोंबरे (शंकरनगर), तृतीय क्रमांक विरूपाक्ष ढगे (नाशिक), प्रियंका ढोबळे (फोंडशिरस), अर्पिता देशमुख (शंकरनगर), उत्तेजनार्थ हर्षाली नाइकनवरे (फोंडशिरस), कुशल कुमार माळी (नाशिक), ऋतुजा ओव्हाळ (इचलकरंजी) यांनी तर जागृती अजय भंडारे (अकलूज) हिला विशेष बालवक्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आली.खुल्या गटात प्रथम क्रमांक प्रसाद जगताप (धुळे), रोहन कवडे (पुणे), द्वितीय क्रमांक अक्षय ईळके (इचलकरंजी), सुजित काळगे (सातारा), तृतीय क्रमांक वैष्णवी हागोने (अमरावती), सेजल कवटेकर (सांगोला), उत्तेजनार्थ सारस रविराज लव्हाळे (संग्रामनगर), सारिका नाईकनवरे (श्रीपुर), सौरव पाटिल (कोल्हापुर), शिवश्री ढेरे (माळेवाडी) यांनी तर डॉ.अमित माने यांना विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेचे नियोजन डॉ.विश्वनाथ आवड, डॉ.अपर्णा कुचेकर, प्रा.निवृत्ती लोखंडे, युवराज मालुसरे यांच्यासह सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी केले.
0 Comments