तुळजापुरात कोरोनाचा कहर मजला आहे

तुळजापूर दि.९(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरासह तालुक्यात कोरोना चा उद्रेक बरोबरच मुत्यु प्रमाणात वाढ होवु लागल्यामुळे सर्वञ चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यात सात दिवसात 192 रुग्ण आढळले आहात आगामी शारदीयनवराञोत्सवा पुर्वी हा उद्रेक रोखणे तिर्थक्षेञ तुळजापूर चाअर्थकरणासाठी महत्वाचे बनले आहे. तुळजापूर तालुक्यात ऐक सप्टेंबर ते सात सप्टेंबर कालावधीत शहरासह तालुक्यात 163 कोरोना बाधीत तर तुळजापूर शहरात 116कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत . यात ऐक सप्टेंबर रोजी तालुक्यात 25, सप्टेंबर 2रोजी 32,सप्टेंबर 3 रोजी 43 सप्टेंबर 4 रोजी 21, सप्टेंबर 5 रोजी 38, 6 रोजी 33, 7 रोजी 30 तर शहरात 1 सप्टेंबर रोजी 9, सप्टेंबर 2रोजी 10,सप्टेंबर 3रोजी 15,सप्टेंबर 4 रोजी 14, सप्टेंबर 5 रोजी 17, 6 रोजी 14 व 7 सप्टेंबर रोजी 21 कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.
कोरोना पार्श्वभूमीवर प्रशाषणाने रविवारी पुकारलेल्या जनता कर्फ्यु त अनेक मंडळी शहरात समुहाने बसल्याचे दिसुन आले जनता कर्फ्यु त दारु विक्री बंद असताना ही आवैध दारु विक्री होत असल्याचे दिसुन आले. विशेष म्हणजे जातधर्मपंथ गरीब श्रीमंत वर्ग सुशिक्षित अशिक्षित न बघता सर्वच वर्गातुन कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण आढळले आहे, तालुक्यातील 108गावातील बहुतांशी लहान मोठ्या गावांन मधुन रुग्ण आढळुन येत आहे. कोरोना बाधीत रुग्णांन मध्ये लोकप्रतिनिधी शाषकिय निमशाषकिय अधिकारी कर्मचारी व्यापारी राजकिय नेते मंडळी चा समावेश आहे. सोलापूर जिल्हालगत असलेल्या गावांन मधुन प्रथमता मोठ्या संखेने रुग्ण आढळत होते. त्यानं हळुहळु शेजारचा गावात पसरुन तालुक्यातील बहुतांशी गावात कोरोना ने शिरकाव केला आहे.
ठराविक भागात गर्दी वाढली.!
तिर्थक्षेञ तुळजापूरात शाषकिय कार्यालय बँका मंदीर तसेच बसस्थानक परिसरात लोकांची गर्दी वाढली असुन सर्वाधिक गर्दी सर्वाधिक शाषकिय कार्यालय असलेल्या मंगळवार पेठ ते आंबेडकर चौक या परिसरात होत आहे,
शहरवासियांनी काळजी घेणे ऐकमेव्य पर्याय !
तिर्थक्षेञ शहरात मार्च ऐप्रील मे या कालावधीत ऐकही पेशंट नव्हता माञ बाहेर जिल्हयातुन मोठ्या संखेने लोक आल्याने तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना पसरु नये या साठी प्रशाषणाने घेतलेल्या तीन महिन्याचा परिश्रमावर पाणी फिरले.
मुख्याधिकारी कोरोना बाधीत ? तुळजापूर शहरातील नगरपरिषद मुख्याधिकारी अशिष लोकरे कोरोना बाधीत झाल्याने त्यांच्या संपर्कात असणारे नगराध्यक्ष सचिन रोचकरी सध्या क्वारटांईन मध्ये असल्याचे समजते.
0 Comments