कळबं पोलीस स्टेशनची वाहतूक शाखा कागदावरच...


कळंब शहरात बार्शी परळी रोड रस्त्यावर एकेरी वाहतूकी मूळे वाहनधारकांची कोंडी ! नागरिंकाचे हाल. पोलीसांनी लक्ष देण्याची गरज.
कळंब दि.९(क.वृ.): शहरातील बार्शी परळी रोडवर सध्यस्थितित रस्तयाचे काम कासव गतीने सुरू असलेने सर्व वाहतुक ही एकेरी मार्गाने सुरू केली आहे. एकाच बाजुने वाहणे जाणे येणे सुरु आहे,परंतु याच रस्त्यावर कशाही प्रकारे अवैध वाहने उभी राहत असल्याने शिवाजी चौका पासुन ते ढोकी नाक्या बार्शी रोड वरती कळबं च्या एमेसिबी पर्यंत तर इकडे साईनगर द्वारकानगरी पर्यंत वाहतुक सुरू असल्याने अनेक वाहन चालकांना वाहन चालवताना त्रास होत आहे.पायी चालणाऱ्या तर नागरिकांना त्याचा हाक नाक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांच्या वाहतुक शाखेने याकडे लक्ष देऊन वाहतुक सुरळीत करावी अशी मागणी वाहनचालकातुन होत आहे. शहरात सध्या मेन रोड ची कामे मोठ्या कंत्राटदाराने सुरू केली आहेत तर काही ठिकाणी दुहेरी वाहतूक सुरू केली आहे पण अवैधरीत्या वाहने रोडवर च पार्किंग करून वाहन मालक निघून जातात त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे पोलीस प्रशासनाची मात्र याकडे बघ्याची भूमिका आहे. कळबं पोलीस स्टेशनची वाहतूक शाखा ही फक्त कागदावरच आहे की काय ,प्रत्यक्षात कुठे काम करते याची चर्चा मात्र शहरात चवीने होत आहे. कळंब ते ढोकी रोड बार्शी परळी रोडवर कंत्राटदाराने अर्धवट कामे केल्याने काही ठिकाणी वाहने जातात तर काही ठिकाणी वाहने जातच नाहीत त्यामुळे या रोडवरती सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे दुसरीकडे परळी बार्शी रोड चे काम मेगा हायवे ही कंपनी करत आहे या कंपनीने तर कहरच केला आहे शहरात सर्व रोड उखडून टाकले आहेत. त्यामुळे पाऊस पडला की चिखल होतात वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबले जात आहे. परळी रोडवरती दुहेरी मार्गाचे काम एका साईडने पूर्ण करून ग्रामीण रुग्णालय पर्यंत हे काम पूर्ण केले आहे पण रोडवरती समोरील दुकानदार आपापली वाहने लावल्यामुळे एकेरी मार्गावरची वाहतूक होत आहे या रोडची साईड पट्टी जर भरली असती तर रोडवरती वाहने लागणार नाहीत पण काम अर्धवट केल्यामुळे वाहनचालकाल याचा हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र वाहतूक पोलिसांचे साफ दुर्लक्ष होत आहे पण पोलिस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन शहरातील पोलिसाचे काम म्हणजे मास्क आहे, का ट्रिपल सीट, दुकान उघडे आहे का अशा पैशाच्या कामातच पोलीस सध्या व्यस्त आहेत त्यामुळे वाहतूक शाखा ही स्वतंत्र रोडवरती असायला हवी अशी मागणी नागरिकांतुन व्यक्त केली जात आहे . याकडे पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष घालून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
0 Comments