Hot Posts

6/recent/ticker-posts

बसस्थानक ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे सँनिटायझ करा

बसस्थानक ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे सँनिटायझ करा


तुळजापूर दि.८(क.वृ.):- बसस्थानकातील ये-जा करणाऱ्या  प्रवाशांना सुध्दा सँनिटाईज करण्याची मागणी भाजपा ने बसस्थानक प्रमुख राजकुमार दिवटे यांना निवेदन देवून केली.
बसआगार प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहेकी  बससेवा सुरु झाल्यानंतर तुळजापुर शहरातील व तालुक्यातील नागरिकांची बरेच अंशी बाहेरगावी जाणे येणे वाढले आहे, नागरीक बसस्थानकात येजा करीत  असताना त्यांचे तापमान तपासावे, तसेच प्रत्येक व्यक्तीला सँनिटाईझ करुनच बसस्थानका बाहेर सोडावे.
बस बसस्थानका बाहेर कुठेही न थांबता थेट बसस्थानकात यावी व प्रवाशी सँनिटायझर करुनच बाहेर सोडावे. तरी सदरील उपाययोजना तत्काळ करावे  सदरील उपाय योजना तत्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इषारावजा निवेदन यावेळी आनंद कंदले, बाळासाहेब भोसले, , प्रसाद पानपुडे, रत्नदीप भोसले, नाना डोंगरे, सचिन रसाळ, सागर पारडे, राम चोपदार, सागर कदम, सुदर्शन डोंगरे, सार्थक मलबा, योगेश फडके आदिंनी दिले.
Reactions

Post a Comment

0 Comments