मूग, उडिद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु - पणन मंत्री बाळासाहेब पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 14, 2020

मूग, उडिद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु - पणन मंत्री बाळासाहेब पाटील

मूगउडिद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु - पणन मंत्री बाळासाहेब पाटील 


मुंबईदि.१४(क.वृ.): हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी 15 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावीअसे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

श्री.पाटील म्हणालेकेंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे उडीदासाठी हमी भाव सहा हजारमूग हमी भाव सात हजार 196 असा जाहीर केला आहे. चालू हंगामात मूगउडीदाची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उद्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरु होत आहे.

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीदमूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकिंत प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा.

केंद्र शासनाकडे हमीभावाने मूगउडीद खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव 31 ऑगस्ट 2020 ला पाठविण्यात आला आहे. लवकरच मान्यता अपेक्षित आहेअसेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages