सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेतृत्व हरपले : पालकमंत्री भरणे
पंढरपूर, दि.१८(क.वृ.):- माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने सहकार, कृषी, शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे जेष्ठ नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आदरांजली अर्पण केल्या आहेत.
पालकमंत्री भरणे यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या सहकार चळवळीत सुधाकर पंत परिचारक यांचा मोठा वाटा होता. सोलापूर जिल्ह्याला सहकार क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. सहकाराची जाण असलेला नेता हरपल्याने कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यांचे सहकार राजकीय, सामाजिक क्षेत्रातील योगदान नेहमी स्मरणात राहिल. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांनी घालून दिलेला आदर्श व सहकारातील मापदंड कायम प्रेरणास्त्रोत ठरेल.
0 Comments