लऊळ येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 18, 2020

लऊळ येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन

 लऊळ येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन


लऊळ दि.१८(क.वृ.): लऊळ ता.माढा येथे अकलूज ता.माळशिरस येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत प्रदीप दिवाण यांच्याकडून आधुनिक शेती संदर्भात मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.या दरम्यान शेतकऱ्यांना मृदा परीक्षण का करावे?,कधी करावे? व कोठे करावे? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
वर्षानुवर्ष पीक लागवडीमुळे मातीची सुपीकता कमी होत आहे त्यासाठी मातीमध्ये कोणती मूलद्रव्ये कमी आहेत तसेच कोणते घातक घटक आहेत याची माहिती मृदा परीक्षणामुळे मिळते.जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला.
यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉक्टर डी.पी.कोरटकर,प्राचार्य आर.जे.नलवडे,कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एम.एकतपुरे कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एम. आडत प्रा.डी.एस.मिटकरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी ग्रा.प.स.दिलीप जोशी, महादेव दिवान,अंबिका जोशी, सुवर्णा जोशी,कविता जोशी, विशाल जोशी,याबरोबरच गावातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages