Hot Posts

6/recent/ticker-posts

मगरीचा वावर असलेल्या नाल्यामध्ये जाऊ नका उपवनसंरक्षक यांचे आवाहन

 मगरीचा वावर असलेल्या नाल्यामध्ये जाऊ नका
उपवनसंरक्षक यांचे आवाहन

 

सोलापूर,दि.१७(क.वृ.): सोलापूर शहराजवळ मौजे देगाव येथून वाहणाऱ्या नाल्यामध्ये मगरीचा वावर असल्याची माहिती  स्थानिक नागरिकांकडून वनविभागाकडे प्राप्त झाली आहे. त्यानुसार सदर नाल्यात असलेल्या मगरीस पकडणे संबंधीची प्राथमिक कारवाई वनविभागाकडून करण्यात येत आहे. तरीही  मगरीचा वावर असलेल्या नाला भागात कोणीही अनावश्यक प्रवेश करु नये, असे आवाहन उपवनसंरक्षक पी.एच.बडगे यांनी केले आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वनविभागाकडून मगरीस पकडता यावे म्हणून सर्व स्थानिक नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे. तेव्हा संबंधित ठिकाणी मगर पाहण्यासाठी गर्दी करणे टाळावे. नाल्या लगतचा भाग निर्मनुष्य ठेवण्यास मदत करावी. कोणी नागरकिांनी सदर नाल्यात प्रवेश केल्यावर मगरीकडून काही दुखापत झाल्यास त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित नागरिकाची असेल.

Reactions

Post a Comment

0 Comments