Hot Posts

6/recent/ticker-posts

सप्टेंबर महिन्याचे नियतन प्राप्त ; मक्याचे नियतनही होणार

सप्टेंबर महिन्याचे नियतन प्राप्त ;
मक्याचे नियतनही होणार



सोलापूर,दि.२६(क.वृ.): राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर 2020 या महिन्याचे ग्रामीण भागासाठीचे गहू, तांदुळ यांच्याबरोबरच मक्याचे नियतन प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली. 

अंत्योदय अन्न योजनेत 57 हजार 272 शिधापत्रिका असून गहू 1146 मेट्रीक टन, मका 286 मेट्रीक टन तर 573 मेट्रीक टन तांदळाचे नियतन मंजूर झाले आहे.  प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या 17 लाख 62 हजार 980 एवढी असून गहू 3526 मेट्रीक टन, मका 1763 मेट्रीक टन तर तांदूळ 3526 मेट्रीक टन धान्य प्राप्त झाल्याची माहितीही श्री. पाटील यांनी दिली. या महिन्यात मक्याचे वाटप करण्यात येत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments