मंद्रुप तहसीलमध्ये आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण


सोलापूर दि.१६(क.वृ.): स्वातंत्र्य दिनानिमित्त मंद्रूप येथे तहसीलदार कार्यालयात आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी तहसीलदार उज्वला सोरटे, सरपंच कलावती खंदारे, माजी सरचिटणीस हनुमंत कुलकर्णी गौरीशंकर मेंडगुदल आदी उपस्थित होते. यावेळी आ. देशमुख यांच्या हस्ते गावातील गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले. त्यानंतर तहसील आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामसेवक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments