'राइड फाॅर नेशनला' सायकल प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अकलूज दि.१६(क.वृ.) अकलूज येथे ७४ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त शिवरत्न स्पोर्टस् अकॅडमी व राॅयल रायडर्स या सायकलिंग क्लबच्या वतीने "रायड फाॅर नेशन" या ७४ किलोमीटर सायकल रायडींगचे आव्हान सायकल रायडींग प्रेमींना केले होते.
या आव्हानाला प्रतीसाद देत लहाना पासून ते जेष्ठांनी सहभागी होते. तब्बल १२० सायकल रायडर्स यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवत ७४ कीमीचे आव्हान पार पाडले. यामध्ये जेष्ठ विक्रम प्रस्थापित केलेले राजेंद्र धायगुडे, श्रीपाद दंडवते-देशमुख तर दिव्यांग सायकलपट्टू सतीश कोरे ,उमेश गोडसे त्याच सोबत हर्षल हरिश्चंद्र पाटील, उस्मान लाला मुजावर ,केशव कुभांर, हे लहान सायकलपट्टू व महीला सायकल रायडर्स यांचा सुद्धा सहभाग लक्षणीय होता.
शिवरत्न स्पोर्टस् अकॅडमी व राॅयल रायडर्स क्लब यांच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या माध्यमातून सहभागी सायकल रायडर्स यांनी रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
त्याच सोबत म्हसवडच्या कारकील घाटात सर्वांनी वंदे मातरम् भारतमाता की जय म्हणत राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा संदेश देत सहभागी सायकल रायडर्स यांनी अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला.
या रायड फाॅर नेशन मध्ये धैर्यशील मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील शितलदेवी मोहिते पाटील हे सुद्धा सहभागी होत ७४ किलोमीटर चे आव्हान पार पाडले.
हा रायड फाॅर नेशन अनोखा उपक्रम पार पाडण्या करीता राॅयल रायडर्स क्लबचे सायकलपट्टू डाॅ.महेश ढेंबरे, अनिल जाधव सर,शिवाजी गोडसे,गजानन जव॔जाळ ,अश्रफ शेख व शिवरत्न स्पोर्टस् अकॅडमी यांनी सर्व नियोजन केले होते तर शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज ग्रामपंचायत व शिवामृत दूध संघ यांचे सहकार्य लाभले.
0 Comments