गोकुळ नगरात आ. देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण




वर्षांनंतर संगोपन केल्यास ‘लोकमंगल’ प्रति झाडास शंभर रुपये देणार
सोलापूर दि.१६(क.वृ.): गोकुळ नगर सोसायटीतील सर्व सदस्यांनी एक तरी झाड लावावे. सर्व झाडांचे एक वर्षांपर्यंत 90 टक्के संगोपन केले तर लोकमंगल समूहाच्या माध्यमातून प्रति झाडास शंभर रुपये देण्यात येतील, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.
जुळे सोलापुरातील गोकुळ नगर येथे आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर राजेश काळे, नगरसेविका राजश्री चव्हाण, सोलापूर सोशल फाउंडेशनचे काटीकर, जाधव, प्रदिप खेडकर आदी उपस्थित होते. आ. देशमुख म्हणाले, गोकुळ सोसायटी ही 97 सदस्यांची असून प्रत्येकांनी एक झाड लावावे व मी तीन झाडे देतो. एकूण शंभर झाडे होतील. या सर्व झाडांचे एक वर्षांपर्यंत 90 टक्के संगोपन केले तर लोकमंगल समूहाच्या माध्यमातून प्रति झाडास शंभर रुपये देण्यात येतील. यावेळी सर्व सदस्यांनी झाडांचे संगोपन करण्याचे आश्वासन दिले. आ. देशमुख यांनी सोसायटीतील दहावी आणि बारावी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments