स्वतंत्र दिनानिमित्त तिरंगा मास्क कोणीही वापरू नये - दिव्यकांत गांधी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 15, 2020

स्वतंत्र दिनानिमित्त तिरंगा मास्क कोणीही वापरू नये - दिव्यकांत गांधी

 स्वतंत्र दिनानिमित्त तिरंगा मास्क कोणीही वापरू नये - दिव्यकांत गांधी


सोलापूर दि.१५(क.वृ):- सध्या संपूर्ण पृथ्वीतलावर कोरोना सारख्या महामारीचे संकट आलेले आहे. त्याप्रमाणे आपल्या देशावर ही कोरोनाचे संकट असल्याने मास्क वापरणे खूप गरजेचे आहे. मात्र 15 ऑगस्ट 2020 रोजी या स्वतंत्र दिनी दिवशी कोणीही ही तिरंगा चा मास्क वापरू नये असे आवाहान वजा विनंती देशप्रेमी, स्वातंत्र्यदिनाची व प्रजासत्ताक दिनाची चळवळ उभा करणारे सोलापूरचे सुपुत्र सदभावना सेवा दल, चेतक रोलर स्केटींग क्लब व सदभावना तिरंगा अभियानचे दिव्यकांत गांधी यांनी केले आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, भारत देशाचा स्वाभिमान असणाऱ्या सर्व नागरिकांना मी आव्हान वाजा विनंती करतो की स्वतंत्र दिनानिमित्त कोणीही तोंडावर मास्क वापरून देशाचा अवमान करू नये. कोरोनासारख्या महामारीला आपल्याला रोखायचे आहेच. परंतु तोंडावर तिरंगा चा मास्क लावल्याने उलट देशाचा म्हणजे तिरंग्याचा अवमान होईल. असे कृत्य कोणीही करू नये तिरंगा हा छातीवर लावण्यात जसा स्वाभिमान आहे, तसा तोंडावर मास्क म्हणून लावण्यात नाही. त्यामुळे सर्वांनी तिरंगा छातीवर लावा असे आव्हान शेवटी दिव्यकांत गांधी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages