Hot Posts

6/recent/ticker-posts

आपण कमविलेल्या रकमेत समाजाचाही वाटा : जयनारायण भुतडा

आपण कमविलेल्या रकमेत समाजाचाही वाटा : जयनारायण भुतडा 


वीरशैव व्हिजनमुळे मिळाली रुपाली मेंगाणे हिला शिष्यवृत्ती 
सोलापूर दि.१०(क.वृ.): व्यक्तीने कमवलेल्या संपत्तीत  समाजाचाही वाटा असतो. आपल्याजवळील काही रक्कम समाजासाठी दिले पाहिजे. दिल्याने वाढते यावर माझी श्रद्धा आहे. याकरिता गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली पाहिजे असे प्रतिपादन समाजसेवक व नीलकंठ बँकेचे संचालक जयनारायण भुतडा यांनी केले. 
पितृछत्र हरपलेल्या रुपाली मेंगाणे या विद्यार्थ्यानीस वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून व  समाजसेवक जयनारायण भुतडा यांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देताना ते बोलत होते. 
रुपालीच्या पित्याचे बारा वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. तिची आई भीमाबाई मेंगाणे दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाक काम करून कसेबसे घर चालवत आहे. तिला एक लहान भाऊ असून तो  माध्यमिक शिक्षण घेत आहे.  तिला पुढील शिक्षण घ्यावयाचे आहे. त्याकरिता 30 हजार रुपये फी भरावी लागणार आहे. मात्र तिची आर्थिक परिस्थिती नसल्याने ती रावजी सखाराम प्राथमिक शाळेतील शिक्षिका मिनाक्षी बिराजदार यांना भेटली. 
बिराजदार यांना वीरशैव व्हिजन ही संस्था गरीब, गरजू व हुशार विध्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देते याविषयी वर्तमानपत्रातील बातम्या वाचून माहित होते.  त्यावरून त्यांनी वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्याशी संपर्क केला. रुपालीची माहिती घेऊन बुरकुले यांनी भुतडा यांच्याशी संपर्क साधला. तेंव्हा भुतडा यांनी लागलीच रुपाली हिला घरी बोलवायला सांगितले. त्यानंतर त्यांनी रुपालीच्या हातामध्ये 5 हजार रुपयांचा चेक सुपूर्द केला. 
यावेळी बिराजदार म्हणाल्या की गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे आज महागडे झाले आहे. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी मदत करणारे दानशूर जयनारायण भुतडा आणि वीरशैव व्हीजनसारख्या संस्थांची गरज आज समाजाला आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सिद्राम बिराजदार, नागेश बडदाळ, संजय साखरे, आंनद दुलंगे, राजेश नीला, सोमेश्वर याबाजी, विजयकुमार बिराजदार, विजयकुमार हेले, अविनाश हत्तरकी, गणेश चिंचोळी, चिदानंद मुस्तारे, विजयकुमार हेले, सिद्धेश्वर कोरे, सोमनाथ चौधरी, संगमेश कंटी, अमित कलशेट्टी, राहुल बिराजदार, बसवराज बिराजदार, धानेश सावळगी, बसवराज चाकाई आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिव कलशेट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन विभुते यांनी केले. 
Reactions

Post a Comment

0 Comments