शिक्षकांचे अन्नत्याग पायी आंदोलन : अकरा दिवसाच्या आंदोलनाचीबेदखल: शिक्षकांमध्ये तीव्र संताप
सोलापूर दि.१०(क.वृ.): राज्यातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना १८ते२० वर्षीपासून वेतन नाही, सर्व शाळांतील शिक्षकांना शंभर टक्के वेतन सुरू करावे या मागणीसाठी गजानन खैरे या शिक्षकाने विनाअनुदानित शिक्षकांच्या वेदनांचा आक्रोश करीत औरंगाबाद ते मंत्रालय अन्नत्याग पायी मोर्चाचा आज अकरावा दिवस आहे.परंतु या शिक्षकाच्या पायी आंदोलनाची शासनस्तरावरून अद्यापी दखल घेतली नसल्याचे शिक्षकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
राज्यातील विनाअनुदानित शाळेतील साठ हजार शिक्षकांनी २० वर्षापासून आश्वासनावर सेवा बजावली आहे.आतातरी हा गंभीर प्रश्न शासनाने सोडवावा म्हणून आंदोलक गजानन खैरे यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबाद ते मुंबई पायी दिंडीचे रस्त्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.राज्यभरातून त्यांना साठ हजार शिक्षकांनी पाठिंबा दिला आहे.विनाअनुदानित शाळांना शाश्वत व कायमस्वरूपी शंभर टक्के वेतनचा आदेश निर्गमित होत नाही तोपर्यत आंदोलन सुरू राहील अशी माहिती आंदोलक गजानन खैरे(औरंगाबाद )या शिक्षकाने सांगितले आहे.
नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचे आंदोलक गजानन खैरे यांनी राज्यातील विनाअनुदानित, अंशतः अनुदानित व कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.राज्यातील साठ हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विनाअनुदानित सेवा करून भरडले जात आहेत.अशा शिक्षकांसाठी औरंगाबाद येथे वीस टक्के वेतनावर अनेक वर्षांपासून सेवा बजावत आहेत.त्यांनी औरंगाबाद पासून विधानभवन पर्यंत शिक्षकांच्या वेतनासाठी पायी मोर्चा काढला आहे.पोटात अन्नाचा कण नसताना ते पावसात भिजत ओल्या कपड्यात पायी निघाले आहेत.त्यांचे रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे.त्यांच्या या निर्णायक आंदोलनामुळे साठ हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.गजानन खैरे यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना जबरदस्तीने हांँस्पिटलमध्ये दाखल करण्याची शक्यता निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे.
0 Comments