जिजाऊ ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष पदी उज्वला साळुंखे यांची निवड
सोलापूर दि.१२(क.वृ.): जिजाऊ ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्षपदी उज्वला गजेंद्र साळुंखे यांची निवड करण्यात आली ही निवड जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती माधुरी भदाने ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव सारिका आंबुरे ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष शोभा बोके यांनी उज्वला साळुंके यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली उज्वला साळुंके अनेक सामाजिक संस्था व कार्यरत असून मनोरमा बँकेच्या त्या संचालिका आहेत तसेच साने गुरूजी कथामालेचा सदस्य तसेच सुरवसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत तसेच अनेक सामाजिक संस्था वर ते कार्यरत आहेत त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 Comments