वाचन संस्कृती रुजवणे हिच डॉ रंगनाथन यांना आदरांजली
सोलापूर दि.१२(क.वृ.): ग्रंथात दडलेले ज्ञान सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवणे त्यांना उत्तम सेवा देऊन वाचन संस्कृती रुजवणे हीच ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह प्रा डॉ श्रीकांत येळेगावकर यांनी केले. डॉ रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त व ग्रंथपाल दिनानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ग्रंथपाल दत्ता मोरे व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments