Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभूर्णीत विश्वदीप उद्योग समूहाच्या कार्यालयाचे पालकमंत्री भरणे यांचे हस्ते उद्घाटन

 टेंभूर्णीत विश्वदीप उद्योग समूहाच्या कार्यालयाचे पालकमंत्री भरणे यांचे हस्ते उद्घाटन


टेंभुर्णी दि.१७(क.वृ.):- विश्वदीप उद्योग समूहाच्या  टेंभुर्णी (ता.माढा) या कार्यालयाचे दि.१५ ऑगस्ट रोजी  मा.पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुनील जोशी ,प्रांत अधिकारी ज्योती कदम,माढा तहसीलदार राजेश चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप,औद्योगिक प्रहार संघटणेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे,  उद्योजक विठ्ठल ढवळे,  रमेश पाटील ,जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतिनिधी शंभूराजे मोरे,आप्पा साहेब उबाळे कारखाना संचालक लक्ष्मण खूपसे प्रगतिशील बागायतदार भरत खूपसे, तंटामुक्ती अध्यक्ष नागनाथ खटके,बार्शी चे ढवळे साहेब  अमोल ढवळे,संतोष यादव,शिवाजी पाटील ,चेअरमन  ब्रह्मदेव मस्के, सोलापुर जिल्हा मराठा सेवा संघाचे पाटील, मार्केकेट कमिटीचे दिलीप भोसले,सुदर्शन टोनपे, सतीश पाटील,अमोल कदम ,मुकुंद महलींगगडे ,पोपट चव्हाण,भारत बावळे,चेअरमन संतोष'खटके , विजय खटके ,  गणेश खटके , संजय कदम ,आबा (मालकप) ढवळे टेंभुर्णी येथिल आश्विनी हाँस्पिटलचे डाँ  आशोक मामा पाडूळे,उद्योजक डाॕ काळे,  सन्माननिय मान्यवर उपस्थित होते. 
विश्वदीप उद्योग समूहाने दरलींग स्टोन क्रशर पेहे ता.पंढरपूर येथे नवीन चालू केला असून त्याचे टेंभुर्णी व परिसरातील कामकाज सदर कार्यालयातुन होणार आहे.सद्या बांधकाम करणे साठी नैसर्गिक वाळू चा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे आणि दर ही सर्वसामान्य माणसाला न परवडणारे आहेत वाळुला पर्याय असणारी उत्तम प्रतीची क्रश सॅन्ड (कृत्रिम वाळू) आता टेंभुर्णी व परिसरातील नागरिकांना सर्व प्रकारची उत्तम दर्जाची खडी ही उपलब्ध होणार आहे. असे विश्वदीप उद्योग समूहाचे प्रमूख बंडूनाना ढवळे यांनी सांगितले. 
यावेळी विश्वदीप उद्योग समूहाचे भागीदार जयकुमार भिसे,अजित वायचळ,श्री पाटील,सचिन होदाडे,बाळासाहेब बोराटे,किशोर सलगर, या कार्यक्रमाचे   सुत्रसंचालन  राजेंद्र मुळे  यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments