Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्टीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती ऑनलाईन साजरी

बार्टीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती ऑनलाईन साजरी


सोलापूर दि.5 (देविदास माने)(क.वृ.):  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी), पुणे यांच्या वतीने लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती झुम ॲप वर ऑनलाईन व्याख्यानच्या माध्यमातून प्रबोधनात्मक साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या परस्थितीत शासनाच्या नियमाचे पालन करीत नागरिका पर्यंत प्रभावीपणे पोहचण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने साजरा केला. बार्टी चे महासंचालक कैलास कणसे , मुख्य प्रकल्प संचालिका समतादूत प्रकल्प प्रज्ञा वाघमारे यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण महाराष्ट्राभर सुरु आहे.
या अनुषंगाने उत्तर सोलापूर तालुक्यात उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभाग क्र.५(अ)नगरसेविका सौ.स्वाती हावळे , प्रमुख पाहुणे उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे उपस्थित होत्या. तसेच बार्टी च्या सहाय्यक प्रकल्प संचालिका समतादूत प्रकल्प जागृती गायकवाड यांची ही उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.प्रा.दिपक काशिनाथ देडे यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास व साहित्यिक वाड्मय या संदर्भात माहिती  दिली. अण्णाभाऊ साठे यांच्या वरती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव पडला तेव्हा अण्णाभाऊ साठे यांनी डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून  व्यवस्थेवरती साहित्याच्या माध्यमातून घाव घालण्याचे कार्य अण्णाभाऊ यांनी केले.
समाधान हावळे यांनी "बार्टी" ही शोषित घटकापर्यंत पोहचणारे एकमेव माध्यम असून शासनाच्या जास्तीत-जास्त योजना गरजु पर्यंत पोहचण्यासाठी शासनानी बार्टीची मदत घ्यावी असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बार्टीचे उत्तर सोलापूर समतादूत यशपाल चंदनशिवे यांनी केले. या कार्यक्रमास तालुक्यातील विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments