Hot Posts

6/recent/ticker-posts

रोहित दादा पवार विचार मंचच्या तालुका अध्यक्षपदी काळे

रोहित दादा पवार विचार मंचच्या तालुका अध्यक्षपदी काळे

माळशिरस दि.५(क.वृ.):रोहित दादा पवार विचार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी प्रा.बाबासाहेब अशोक काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
छत्रपती शिवाजी महाराज ,शाहु महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा तसेच राज्यात नेतृत्व करणारी आदरणीय श्री . रोहित दादा पवारसाहेब यांनी त्यांच्या विचाराने ज्याप्रमाणे राज्यभर सामाजिक कार्य व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविले व राज्यातील तळागळातील सर्वसामान्यांचे हात बळकट केले त्याचप्रमाणे आपण ही त्यांच्या पुढील वाटचालीत सामाजिक व राजकिय विधायक कार्य उत्तम प्रकारे व नियोजनबध्द पध्दतीने करावे आशा शुभेच्छा नियुक्ती पत्रात दिल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. मच्छिंद्र गोरड सर. जिल्हा अध्यक्ष योगेश भैय्या देशमुख पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली पत्र देण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments