माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या 93 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास सुरुवात
सांगोला (प्रतिनिधी) भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आणि भाई गणपतराव देशमुख यांचा दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या 93 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुरोगामी युवक संघटना, विज्ञान महाविद्यालय सांगोला आणि न्यू इंग्लिश स्कूल सांगोला यांच्या वतीने विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
सदर रक्तदान शिबिरास संस्थेचे चिटणीस विठ्ठलराव शिंदे,माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, नगरसेविका स्वातीताई मगर, नगरसेवक सुरेश आप्पा माळी, नगरसेवक श्री तांबोळी,महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी शिंदे, न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेजचे प्राचार्य हनुमंत गोसावी, प्रा. तानाजी फुलारी, प्राध्यापक विजय पवार, प्राध्यापक काकासाहेब घाडगे,महुद चे युवा नेते ऍड धनंजय मेटकरी,गायगव्हान चे सरपंच दिपक गोडसे,आदि मान्यवर उपस्थित होते.कोरोनाचा वाढता कहर पाहता रक्ताची कमतरता भासू नये,या उद्देशाने सदर रक्तदान शिबिराचे संपूर्ण तालुक्यात जि प गटनिहाय आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शेकाप सरचिटणीस विठ्ठलराव शिंदे,आणि पुरोगामी युवक संघटनेचे दिपक गोडसे यांनी दिली.या वेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिराचे रक्त संकलन अक्षय ब्लड बँकेने केले.या वेळी प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले.
सदर रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे कर्मचारी प्रकाश जांगळे,चंद्रकांत पवार, राजू सादिगले प्रयत्न करीत आहेत.
0 Comments