Hot Posts

6/recent/ticker-posts

आ.दत्तात्रय सावंत यांचेकडून कोळा विद्यामंदिर प्रशालेस झेराॅक्स मशिन

आ.दत्तात्रय सावंत यांचेकडून कोळा विद्यामंदिर प्रशालेस झेराॅक्स मशिन 


सांगोला (वार्ताहर) पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.दत्तात्रय सावंत यांच्या आमदार फंडातून कोळा विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजकरिता झेराॅक्स,फॅक्स,मेल,स्कॅनर,प्रिंटर यासारख्या सुविधा देणारी (5 in 1) झेराॅक्स मशिन देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रारंभी कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्राचे पुजन आणि पुष्पहार समर्पण मान्यवरांचे हस्ते  करण्यात आले.प्रास्तविकात प्राचार्य विसापुरे यांनी आ.दत्तात्रय सावंत यांचेकडून सर्व शिक्षक,विद्यार्थी आणि शाळांच्या विविध प्रश्नांबाबत होणा-या सहकार्याबदद्ल धन्यवाद देत आभार व्यक्त केले.
यावेळी उपस्थित श्रीनिवास येलपले (मा.चेअरमन-बाळे शिक्षक पतसंस्था),शिवाजी चव्हाण (राज्य संघटक-महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती),डी.के.पाटील यांचे स्वागत व सत्कार प्रशासकीय मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी सांगोला विद्यामंदिरचे उपमुख्याध्यापक पैलवान ,पर्यवेक्षक जांगळे,बारबोले,केदार ,माने यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी तर आभार सांगोला विद्यामंदिर ज्युनि.काॅलेजचे उपप्राचार्य गंगाधर घोंगडे सर यांनी मानले.
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षक-विद्यार्थी आणि शाळा केंद्रस्थानी ठेवत विविध उपकरणे,शैक्षणिक साहित्य,पुस्तके यांचे वाटप सातत्याने केले असून राज्यातील सर्व विनाअनुदानित शिक्षकांना वेतन सुरु झाल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा पण केल्याचे श्रीनिवास येलपले सांगितले.
2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षक बांधवांचा जुन्या पेन्शन योजनेत समावेश करावा या मागणीसाठी त्यांनी वर्धा-नागपूर ही पायी दिंडी काढली होती.
सर्वच शैक्षणिक समस्यांची जाण असणारा आणि त्यासाठी लढा देणारा शिक्षक आमदार म्हणून दत्तात्रय सावंत साहेबांची कारकिर्द यशस्वी असल्याचे संबोधन यावेळी शिवाजी चव्हाण यांनी केले. 
Reactions

Post a Comment

0 Comments