शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने ७४ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा

सांगोला दि.१७(क.वृ.): सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने भारतीय स्वातंत्रदिनाचा ७४ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला .
स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात अध्यक्ष चैतन्य राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .ध्वजास अच्युत फुले यांनी मानवंदना दिली. सदर ध्वजारोहण कार्यक्रम कोरोनामुळे सर्व शिस्थ व अटी पाळून शासकीय नियमाप्रमाणे साजरा करण्यात आला ,यावेळी संघटनेचे सद्यस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments