Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पुजन संपन्न

 सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पुजन संपन्न


भाळवणी दि.१७(क.वृ.):- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2020-2021 च्या मिल रोलरचे पुजन कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 
राज्य शासनाने कारखान्याच्या कर्जाला थकहमी देण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच कारखान्याकडे एमएससी बँकेकडून पैसे उपलब्ध होताच ऊस पुरवठादार शेतकरी व ऊस तोडणी वाहतुकीचे मागील देणी प्राधान्याने देण्यात येणार असल्याचे यावेळी चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले.
राज्य शासनाने सन 2020-21 चा गळीत हंगाम 15 ऑक्टोंबर पासुन सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने कारखान्याचा सन 2020-21 गळीत हंगाम वेळेत सुरु करण्याच्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात येत असून, त्याअंतर्गत कारखान्यातील मशिनरींचे ओव्हर हॉलिंग, देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने चालु आहेत. त्याअंतर्गत मील रोलरचे पुजन कल्याणराव काळे यांच्याहस्ते करण्यात येवुन, त्यांच्या हस्ते यांत्रिक पध्दतीने रोलर बसविण्यात आला. 
यंदाच्या हंगामात जास्तीत-जास्त ऊसाचे गाळप करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. या गळीत हंगामामध्ये सहा लाख मे.टन ऊसाचे गाळपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, त्यासाठी ऊस तोडणी व वाहतुक यंत्रणेसाठी ट्रक, ट्रॅक्टर, डंपींग, बैलगाडीचे व हार्वेस्टींग मशिनचे करार करण्यात आले आहेत. 
 यावेळी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन मारुती भोसले, संचालक बाळासाहेब कौलगे, मोहन नागटिळक, बिभिषण पवार, विलास जगदाळे, इब्राहिम मुजावर,अरुण बागल, एम.एस.सी.बँकेचे प्रतिनिधी आर.एस.पाटील, कारखान्याचे सेक्रेटरी, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments