शहीद धनाजी तानाजी होणमाने यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर
सोलापूर दि.११(क.वृ.): पुळूज होनमाने वस्ती येथील उपनिरीक्षक धनाजी तानाजी होणमाने यांच्या जयंतीनिमित्त येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.दिवसभर रिमझिम पावसात ग्रामस्थांनी येऊन 105 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या शहीद बंधूंस श्रद्धांजली अर्पण केली. शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी तानाजी होणमाने यांच्या जयंतीनिमित्त पुळूज येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.भर पावसात येऊन 105 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या शहीद बंधूंस श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे उद्घाटन सुट्टीवर असलेले कुरूल येथील जवान राहुल धर्मशाळे व अतुल पवार पत्रकार सुहास घोडके यांच्या हस्ते झाले.यावेळी बाजीराव पेशवे सैनिकी विद्यालय येथील छोट्या सैनिकांनी अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणी सुंदर सलामी दिली.या प्रसंगी वीरपिता तानाजी होणमाने वीरबंधू विकास होणमाने यांच्यासह आबा कांबळे, मेजर भोसले दादा, सुरवसे मेजर, लिंगा निळगुंडे, शशिकांत खरात, प्रविण गावडे,अण्णा शेंडगे,सरपंच शिवाजी शेंडगे,महादेव शिंदे व सर्व शहीद धनाजी होनमाने मित्रपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन प्रमोद गावडे, धनाजी वाघमोडे, रविकांत खरात यांनी केले. यामधे गोपाबाई दमानी रक्तपेढी सोलापूर यांनी संपूर्ण सहकार्य करून आपली संपूर्ण जबाबदारी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली. व सर्व ठिकाणी मोलाची साथ सर्व ग्रामस्थांनी दिली.
0 Comments