मराठा प्रवर्गातील युवक-युवतींना व्यवसायाची संधी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 11, 2020

मराठा प्रवर्गातील युवक-युवतींना व्यवसायाची संधी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा

 मराठा प्रवर्गातील युवक-युवतींना  व्यवसायाची संधी
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा

 


पुणे,दि.११(क.वृ.): जिल्ह्यातील मराठा आर्थिक दुर्बल घटकातील तरुण-तरुणीयुवक व उद्योजक बनू इच्छिणाऱ्या आणि तशी क्षमता असणाऱ्या व्यक्तींना सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने व्यावसायिक कर्जावरील व्याज परतावा योजना व कर्ज पुरवठा योजना राबविण्यात येतात. अण्णासाहेब पाटील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्ह्यातील १ हजार ४१८ लाभार्थ्यांना विविध बँकेमार्फत ८० कोटी ६० लाख ६८ हजार २१२ रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत पुणे जिल्ह्यातील ८४१ लाभार्थ्यांना २ कोटी ५३ लाख ७१ हजार ५८५ रुपये व्याज परतावा देण्यात आला आहेअशी माहिती जिल्हा समन्वयक संकेत लोहार यांनी दिली आहे. 

मराठा समाजातील युवक युवतींनी नोकरीपेक्षा स्वतःचा उद्योगव्यवसाय उभारणीला प्राधान्य देण्यासाठी महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच सिबिल (CIBIL) प्रणाली अंतर्गत येणाऱ्या बँकांनीही या योजने अंतर्गत असणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी द्यावीअसे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन दुग्ध व्यवसायप्रवासी वाहनेकिराणा दुकानशेळीपालनझेरॉक्स सेंटरसायकल दुरुस्तीचर्मोद्योग फोटोग्राफीगारमेंट्सरिक्षाघरगुती मसाले इत्यादी व्यवसाय यशस्वीरित्या सुरु केले आहेत. महामंडळाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रपुणे कार्यालयामार्फत केले जाते. मराठा प्रवर्गातील लाभार्थ्यांनी महामंडळाच्या संधीचा लाभ घेऊन व्यवसायाला सुरुवात करावीअसे आवाहन पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages