दुध दरवाढची सदबुध्दी सरकारला देविने देण्यासाठी भाजपा तर्क देवीदारी जागरण गोंधळ आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 1, 2020

दुध दरवाढची सदबुध्दी सरकारला देविने देण्यासाठी भाजपा तर्क देवीदारी जागरण गोंधळ आंदोलन

दुध दरवाढची सदबुध्दी सरकारला देविने देण्यासाठी भाजपा तर्क देवीदारी जागरण गोंधळ आंदोलन



तुळजापूर दि.१(क.वृ.):- ञिमुर्ती आगाडी सरकारला शेतकऱ्यांना दुध दरवाढ देण्याची सुबुध्दी श्रीतुळजाभवानी मातेने  द्यावी या साठी  भारतीय जनता पार्टीच्या देवी दारी जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेवुन आघाडी सरकारच्या विरोधात शनिवार दि.1 ऑगस्ट २०२० रोजी  आंदोलन करण्यात आले.
या जागरण गोंधळाचा विधी राजाभाऊ गायकवाड यांनी केला. त्यावेळी बोलतानि  आमदार मा राणा जगजितसिंह जी पाटील,म्हणाले  शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्या बाबतीत दुजाभाव करणारे हे ञिमुर्ती आघाडी सरकार आहे.यांना आंदोलनाची भाषा कळत नाही त्यामुळे आता आम्हाला यांना देविनेच सदबुध्दी द्यावी यासाठी हेजागरण गोंधळ आंदोलन केल्याचे सांगुन शेतकऱ्यांना दुधदरवाढ मिळवून दिल्या शिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचे यावेळी सांगितले .
या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे तालुका अध्यक्ष संतोष दादा बोबडे, जिल्हा मजूर फेडरेशन चे माजी चेअरमन तथा नगरसेवक नारायण नन्नवरे, नगरसेवक विशाल रोचकरी अभिजीत कदम, भाजपा महिला आघाडी जिल्हाउपाअध्यक् मिना सोमाजी प्रभाकर  मुळे, शहर अध्यक्ष सुहास साळुंके,जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक ,संजय खुरुद सागर कदम  विकास मलबा . बाळासाहेब शामराज,बाळासाहेब शिंदे आनंद कंदले, उमेश गवते,सचिन अमृतराव, गिरीश देवळालकर, प्रसाद पानपुडे, विकास मलबा, बाळासाहेब भोसले, सचिन रसाळ, सागर कदम, सागर पारडे, हरिभाऊ वट्टे, विक्रांत देशमुख, तानाजी कदम उमेश गवते, आनंद कदम, शहाजी कदम आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages