Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचा माढा महावितरणकडे 41 वीजेच्या खांबाचा मागणीचा प्रस्ताव

 विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचा माढा महावितरणकडे 41 वीजेच्या खांबाचा मागणीचा प्रस्ताव


माढा (राजेंद्र गुंड)दि.१९(क.वृ.):- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीने कुर्डूवाडी येथील पंचायत समिती कार्यालयाकडे सादर केलेल्या प्रस्तावावर  गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील यांनी शिफारस केलेला वाढीव हद्दीत व वस्त्यांवर 41 वीजेचे खांब शासनाच्या भगीरथ योजनेतून स्ट्रीट लाईटसाठी मिळण्यासाठीचा रितसर प्रस्ताव सरपंच अरुण कदम व वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे यांनी माढ्याचे महावितरणचे सहाय्यक अभियंता वैभव पळसकर यांच्याकडे 19 ऑगस्ट रोजी सादर केला.
विठ्ठलवाडीतील शेंडगे प्लॉट,गुंड वस्ती,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागील परिसर,शिंगाडे वस्ती,मस्के वस्ती,जगताप वस्ती, भडकवाड वस्ती,भिसे वस्ती या भागात शासनाच्या भगीरथ योजनेतून 41 वीजेचे खांब मंजूर करुन वीजपुरवठा सुरळीत करणे आवश्यक आहे याकरिता मागणी व पाठपुरावा सुरू आहे.हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महेश लोखंडे व सहाय्यक अभियंता वैभव पळसकर यांना दुरध्वनीवरुन आदेश दिले असल्याचे सरपंच अरुण कदम यांनी सांगितले.
याप्रसंगी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता मृणाली मेश्राम, वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे, ग्रामसेवक हनुमंत कदम,राजेंद्र गुंड,उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, गोरख शेगर,वायरमन कपील कांबळे, शिवाजीराव यमलवाड,सौदागर खरात,सतीश गुंड,सुभाष सस्ते,नागेश देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
विठ्ठलवाडी गावाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून वाढीव वस्त्या व हद्दीत शासनाच्या भगीरथ योजनेतून स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करण्यासाठी 41 वीजेच्या खांबांची रितसर प्रस्तावाद्वारे मागणी केली असून त्वरित पुढील तांत्रिक बाबींची पूर्तता व वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेऊन लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल अशी प्रतिक्रिया उपकार्यकारी अभियंता महेश लोखंडे व सहाय्यक अभियंता वैभव पळसकर यांनी दिली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments