Hot Posts

6/recent/ticker-posts

सोशल डिस्टंसिंग पाळुन बस वाहातुक जिल्हा अंतर्गत सुरु होणार

सोशल डिस्टंसिंग पाळुन बस वाहातुक जिल्हा अंतर्गत सुरु होणार


तुळजापूर दि.१९(क.वृ.):- महाराष्ट्र शाषणाने अखेर गुरुवार दि.20 पासुन आंतर जिल्हा एस टी वाहतुकिस परवानगी दिल्याने लालपरी अखेर धावणार असल्याने यामुळे प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवार दि.19 रोजी सांयकाळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विभाग नियंञकांना आंतर जिल्हा बसवाहतुक सुरु करण्याचे परिपञक काढले आहे.
कोरोना मुळे राज्यात 22/3/2020 रोजी एस.टी वाहतूक सेवा बंद केली होती ती अंशता 22/5/2020 रोजि जिल्हा अंतर्गत वाहतूक सेवा सुरु करण्यास परवानगी दिली आता 20/8/2020 पासुन आंतर जिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे
टप्पा टप्याने वाहतूक सुरु करण्याचे नियोजन करावे हे करताना शाषणाने विनिदिर्ष्ट केलेल्या नियमाचा आदर घेवुन सुरु करावी. आता बसेस ना ई-पासची आवश्यकता असणार नाही सोशल डिस्टंन्स नियम पाळुन त्याप्रमाणात वाहतूक करावी. 
Reactions

Post a Comment

0 Comments