"भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोटेवाडी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची आणि अपहाराची चौकशी व्हावी"- माजी ग्रामपंचायत सदस्य दादासो सावंत यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार
उपमुख्य कार्यकारी काय कारवाई करणार ? याकडे ग्रामस्थांचे लक्ष .
सोलापूर ( विशेष प्रतिनिधी): लोटेवाडी (ता.सांगोला) ग्रामपंचायत मध्ये विकास कामे करताना शासकीय निधीचा गैरवापर करून संबंधितांनी रखमा बाबत अपहार केला असून सरपंच पुत्र व ग्रामसेवकांनी संगनमत करून लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार केला आहे, या भ्रष्ट्राचाराची चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी,अशा आशयाची तक्रार माजी ग्रामपंचायत सदस्य दादासो सावंत यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि प सोलापूर यांच्याकडे केली आहे.
विकास कामे करताना या कामात गैरव्यवहार व अपहार केल्याची शंका आल्याने ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकाराप्रमाणे अर्ज देऊन मी स्वतः माहिती मिळवली, त्यानुसार मार्च 2017 ते जून 2017 तीन महिन्याच्या कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत एलईडी पथदिवे खरेदी केले आहेत, ते एकूण किती? कोणाकडून? प्रत्येकी किंमत खरेदीच्या पावत्या, गावात कोणकोणत्या वीज खांबावर एलईडी बसवले व एलईडी खरेदीसाठी एकूण किती रक्कम खर्च झाली ? याची प्रत्यक्ष चौकशी व्हावी तसेच नवी लोटेवाडी मारुती मंदिर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरासमोरील सातारकर वस्ती येथील दुर्गामाता मंदिरासमोरील तसेच जुनी लोटेवाडी मारुती मंदिरा समोरील बसवण्यात आलेली पेव्हीग ब्लॉक इत्यादी कामकाजासाठी प्रत्येक कामाचे ठिकाणी एकूण किती ब्रास काम झाले,काम कोणाकोणास दिले? त्या ठेकेदारांचे नाव, ठेकेदारांची नोंदणी आहे काय? काम ज्यांनी केलेच नाही त्यांच्या नावे बिले काढण्यात आलेले आहेत , शासनाच्या सदर प्रत्येक कामासाठी मंजूर निधी व प्रत्यक्ष खर्च किती झाला? याची चौकशी व्हावी, अशी ही मागणी दादासो सावंत यांनी केली आहे.
त्याप्रमाणे नवी लोटेवाडी येथील भानुदास सावंत घर ते सिद्धार्थ गडहिरे घर व शंकर विठोबा सावंत ते पंढरीनाथ भंडारे घर असे दोन सिमेंट रस्ते केल्याचे आढळून आलेले आहे, मात्र प्रत्यक्षात सदर ठिकाणी एकच रस्ता आहे याची चौकशी व्हावी, नवी लोटेवाडी येथील बाबूलाल सावंत ते बाळू नाथा सावंत यांचे घराचे दरम्यान सिमेंट रस्ता केलेला दाखवला आहे मात्र प्रत्यक्षात सदर ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नाही, अशा गंभीर चुका ग्रामपंचायतीने केल्या असल्याचे दादा सावंत यांनी तक्रारी अर्जात म्हटले आहे.
नवी लोटेवाडी येथे तीन मुताऱ्या ग्रामपंचायत रेकॉर्ड नोंद आहेत, मात्र प्रत्यक्षात दोनच मुताऱ्या अस्तित्वात आहेत.तिसऱ्या मुतारीचे काय झाले ? याची ही चौकशी व्हावी ? सातारकर वस्ती नवी लोटेवाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे, सावंत वस्ती तसेच जुनी लोटेवाडी एकूण पाच ठिकाणी असणाऱ्या समाज मंदिरासाठी 2016 ते 2020 या सालात दरवर्षी केलेली दुरुस्ती रंगरंगोटी व देखभाल इत्यादीबाबत 14 वा वित्त आयोग व १५% मागासवर्गीय विकास निधीतून केलेला खर्च केवळ रेकॉर्ड सदरी दाखविण्यात आला आहे, रेकॉर्ड सदरी दाखवलेला खर्च प्रत्यक्षात करण्यात आलेला नाही, सदर बाबत खर्चाचे बोगस रेकॉर्ड बनवण्यात आले आहे,काम ज्यांनी केलेच नाही त्यांची नावे बिले काढण्यात आलेली आहेत. त्यांचीही चौकशी व्हावी,अशी मागणी दादासो सावंत यांनी केली आहे.
नवी लोटेवाडी येथे गोरख सावंत घर ते शरद सावंत घर असा दर्शविलेला सिमेंट रस्ता प्रत्यक्षात शरद सावंत यांच्या घरापर्यंत केलेला नाही, सदर रस्त्याच्या मोजमापामध्ये सावळा गोंधळ आहे, तसेच सदर रस्ता निकृष्ट दर्जाचा असून त्याची गुणवत्ता चाचणी पुन्हा घेण्यात यावी, नवी लोटेवाडी ते राजाराम विठोबा सावंत घर ते संपदाबाई सावंत घर असा सिमेंट रस्ता दर्शन पुन्हा राजाराम सावंत घर ते अजित सावंत घर अशा सिमेंट रस्त्याचे काम केले आहे, तिथे दोन रस्ते मुळीच अस्तित्वात नाहीत, प्रत्यक्षात एकच रस्ता अस्तित्वात आहे,एवढा मोठा भ्रष्टाचार रस्त्याच्या कामात त्याचीही चौकशी व्हावी,तसेच नवी लोटेवाडी जूनी लोटेवाडी सातारकर वस्ती येथील ग्राम अंतर्गत असणाऱ्या सिमेंट रस्त्याची मोजमापे व गुणवत्ता चाचणी मॅनेज पद्धतीने झालेले आहेत, सदर रस्ते अपुऱ्या मोजमापाचे आहेत, सदर रस्ते नवीन असूनही अनेक ठिकाणी उखडलेले असून खडी व सिमेंट बाहेर निघत आहे.बऱ्याच रस्त्याचे सिमेंट काम निकृष्ट झाले आहे, त्याबाबत पुन्हा गुणवत्ता तपासणी व्हावी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सदर अर्जात नमूद केली आहे.
शासकीय निधी मधून २०१८ मध्ये ओढा रुंदीकरण व खोलीकरण करतेवेळी ओढा पात्राशी संबंधित क्षेत्राचे खातेदार शेतकरी मधुकर भगवान कुलकर्णी हे एप्रिल २०१८ मध्ये मयत आहेत, सदर वेळी जून २०१८ मध्ये नमूद कामकाजाशी संबंधित असा पंचनामा तयार करून पंचनामा वर मयत मधुकर कुलकर्णी यांची खोटी व बोगस सही केलेली आहे,सदर पंचनामा कागदपत्राची प्रत्यक्ष चौकशी व्हावी.
ग्रामपंचायत रेकॉर्डला अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सरपंचाच्या सह्या नाहीत, महिला सरपंच पुत्र सुरेश बोडरे यांनी ग्रामसेवक यांच्या संगनमताने व आर्थिक हात मिळवणी करून ग्रामपंचायतीच्या मासिक मिटींगला हजर राहून सूचक अनुमोदक म्हणून सही करून बेकायदेशीर व रद्दबादल ठराव एका मिटींगच्या वेळी केलेला आहे, त्याचीही चौकशी व्हावी. रक्कम रुपये तीन लाखाचे वरील कामाचे टेंडर कोणत्याही वर्तमानपत्रात प्रसिद्ध न करता वेळोवेळी त्याच त्या ठेकेदाराला मॅनेज करून देण्यात आलेले आहेत, प्रत्येक वेळी फक्त तीनच टेंडर भरले जातात, याची शहानिशा करून प्रत्यक्ष चौकशी व्हावी असेही दादा सावंत यांनी या तक्रारीत म्हटले आहे.या वेळी सरपंच उमाबाई बोडरे यांच्याशी 8888602632 या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,त्यांचा संपर्क झाला नाही.

वरील सर्व कामाच्या संदर्भात ग्रामसेवक बुरुंगले यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची ई निविदा मागवून कामे केली असून,रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबतीत आम्ही बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांच्या कडून चाचणी करून घेवू,एल इ डी दिव्याबाबत जुनी,नवी लोटेवाडी व सातारकर वस्ती येथे दिवे बसविले असल्याची माहिती दिली.
0 Comments