सांगोला शहरात आगळावेगळा उपक्रम; मेंढ्यांचा वाढदिवस साजरा
सांगोला दि.२८(क.वृ.) : आपण लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकापर्यंत ज्याप्रमाणे वाढदिवस साजरा करतो त्याप्रमाणे ६० मेढ्यांचा आगळावेगळा वाढदिवस काल दिनांक २७ जुलै रोजी सांगोला शहरातील जुना मेडशिंगी रोड येथील गावडे वस्ती येथे फटाक्यांच्या आतषबाजीने व केक कापून साजरा करण्यात आला. गावडे वस्ती येथिल सिद्धेश्वर गावडे व गावडे परिवार गेल्या वर्षी पासून या प्रकारचा मेंढ्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत आणि अशीच प्रथा कायम सुरू राहील असे मेंढ्यांचे मालक सिद्धेश्वर गावडे यांनी सांगितले.
सर्व मेंढपाळ आणि समाज बांधव एकत्रित येण्याच्या हेतूने हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. मेंढ्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा अशीच चालू ठेवणार असल्याचे धनगर समाज सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष बाबुराव गावडे यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक तायाप्पा माने, सचिन गावडे, शरद गावडे, सुरेश गावडे, संतोष गावडे, कातरकरि व गावडे परिवार उपस्थित होता.
0 Comments