इंदुरीकर महाराजांनवरील गुन्हा मागे घेण्यासाठी भजनकिर्तन आंदोलन
तुळजापुरात विश्व वारकरी सेनेच्या वतीने तहसील यांना दिले मागण्याचे निवेदन
तुळजापुर दि.२८(क.वृ.): ह.भ.प. इंदुरीकर महाराजांन वर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा यासह अन्य मागण्यांसाठी तुळजापूर तालुका विश्व वारकरी सेनेच्या वतीने , .३०जुलै 2020रोजी क्षेत्र पंढरपूर येथील विश्व वारकरी सेनेच्या विविध मागण्या संदर्भात आयोजित केलेल्या आमरण उपोषण आंदोलन समर्थनार्थ येथील तहसील समोर भजन किर्तध आंदोलन करण्यात येणार आहे.अशा आशयाचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.
तिर्थ क्षेत्र पंढरपूर येथील नामदेव महाराजांच्या वंशजावर झालेला गुन्हा त्वरीत माघे घ्यावा,गोकुळ अष्टमी पासुन राज्या मध्ये ५० वारकरी भाविकांना नियम व अटी लावुन भजन किर्तन करण्यास परवानगी द्यावी. ह.भ.प.निवृती महाराज इंदुरीकर यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा. महाराष्ट्रातील तिर्थ क्षेत्र नियम व अटी लावुन उघडावे.लावुड स्पीकर चा नियम मंदीर, मज्जीद करिता समान असावा तसेच झी मराठी वहिनीवरील "फु बाई फु" या कार्यक्रमा दरम्यान वारकरी किर्तन पंरपंरेचा अपमान केल्या बद्दल झी मराठी वहिनीवरील व कलाकारावर गुन्हा दाखल करावा यासाठी दि.३० जुलै रोजी तुळजापुर तहसील समोर भजन किर्तन आंदोलन करण्यात येणार आहे.
या निवेदनावर विश्ववारकरी सेना तालुका अध्यक्ष ह.भ.प. सुरेश डेरके, विश्ववारकरी सेनेचे सहाय्यक तालुका अध्यक्ष ह.भ.प.राजाभाऊ पवार विश्व वारकरी सेनेचे उपाध्यक्ष ह.भ.प.धनाजी कुरुंद ह.भ.प. बापु माळी गणेश भनगे महेश पवार सर्जेराव निकम आनंद सावंत मोहन शिंदे महादेव पौळ आदीसह वारकरी लोकांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
0 Comments