Hot Posts

6/recent/ticker-posts

एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीने पञाध्दारे मांडली मुख्यमंत्री उपमुख्यामंत्र्यांकडे व्यथा

एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीने पञाध्दारे मांडली मुख्यमंत्री उपमुख्यामंत्र्यांकडे व्यथा



कोरोनाने केले एस टी कामगारांचा कुंटुंबियांचे भविष्य अंधकारमय !
एस टी कामगारांच्या मुलीची व्यथा !
जगण्यापुरती तरी मदत द्या
तुळजापूर दि.२८(क.वृ.):- "मी एस टी कामगाराची मुलगी असुन याचा मला अभिमान आहे माञ कोरोना ने आम्ही एस टी कामगारांचा कुंटुंबियांचे भविष्य अंधकारमय केले असुन आमच्या भविष्य प्रकाशमान होण्या साठी शाषणाचा मदतीचा हात हा ऐकच पर्याय एसटी कर्मचाऱ्यांच्या  समोर दिसत आहे
सध्या आमचा वडीलांना नियमीत वेतन मिळत नाही पण ते दुख आम्हा लेकरांचा काळजी  आम्हाला सांगत  नाहीत आम्हा दोघा बहीणांना शिक्षणासाठी पैसा कमी पडू नये यासाठी त्यांनी रक्ताचे पाणी केले पण त्यांचा समोर कोरोनाने ही जगण्यासाठी प्रश्न निर्माण केला आहे आता करावे काय! असा प्रश्न पडला आहे.
गावी शेती नाही घर नाही जगण्याचा आधार फक्त एस टी आहे तोही आधार कोरोना हिरावून घेत आहे पन्नास वर्षवरील कामगारांसाठी  स्वछ  निवृत्ती वादळ उठले आहे.ते भयावाह  वाटत आहे मरणाचा दारी नेणारे हे वादळ आहे,
सध्या वेतन अभावी एस टी कामगारांचे कुंटुंब अर्थिक विवेचनात आहे कुणी भाजापाला विकत आहे कुणी मजूर म्हणून गवड्यांचा हाताखाला कामाला जात आहे.मिळेल ते कामे एसटी कर्मचारी लेकराबाळांचा भविष्य साठि करीत आहेत पण कोणीही एसटी कामगारांन कडे लक्षदेत नाही ही आमची शोकांतिका आहे. एस टी सेवा अत्यावश्यक सेवे मध्ये मोडते पण तरी शाषण एस टी कामगारांना अत्यावश्यक सेवैत का सामावुन घेत नाही हा आमचा शाषणला सवाल आहे.
आमची मायबाय सरकारला ऐवडीच विनंती आहेकी आम्हाला फक्त न फक्त जगण्यापुरतेच वेतन द्या सध्या शाषकिय कर्मचाऱ्यांना कमी श्रम करीत असुन त्यांना त्यांचा श्रमापेक्षाकितीतरी अधिक वेतन आहे श्रमाचा विचार करुन  कमी श्रम वाल्यांचा पैसा घेवुन तो आम्हा एसटी कर्मचाऱ्यांना देवुन त्यांना फक्त जगण्यासाठी मदतीचा हात द्या अशी आमची इछा आहे." अशी आर्त हाक नंदिनी सुरवसे या एसटी कामगारांचा मुलीने मुख्यमंत्री राज्यपाल यांच्या कडे आपल्या पञाचा माध्यमातून केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments