आँनलाईन खरीप पिकविमा भरण्यास अडथळा
तुळजापूर दि.२८(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आँनलाईन खरीप पिकविमा भरण्यास अडचण निर्माण होत असल्याने शाषणाने आँफ लाईन पिकविमा भरुन घेवुन पिकविम्याची मुदत वाढविण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती संजय भोसले यांनी कृषी अधिकारी नामदेव जाधव यांच्या कडे केली आहे.
तुळजापूर तालुक्यात यंदा निसर्ग अवकृपे मुळे शेतकरी खरीप पिकविमा मोठ्या प्रमाणात भरत आहेत पिकविमा आँनलाईन भरताना त्यास सातबारा अँटेच होत नसल्यामुळे पिकविमा भरण्यासाठी अडचण येत आहे,.पिकविमा मुदत31जुलै 2020अखेर पर्यत असल्याने त्यामुळे शेतकरी पिकविमा भरण्या पासुन वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.आजपर्यत तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना या समस्ये मुळे पिकविमा भरता येणे शक्य झाले नाही तरी पिकविमा आँफलाईन भरण्यासाठी परवानगी द्यावी व पिकविमा भरण्याची मुदत वाढवावी अशा मागणी चे निवेदन कृषीउत्पन्नबाजारसमिती उपसभापती संजय भोसले व शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम यांचा नेतृत्वाखाली तालुक्यातील गंधोरा येथील शेकडो शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी नामदेव गायकवाड यांच्या कडे दिले.
0 Comments