Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना रुग्णांसाठी प्रशासनाने काटेकोरपणे सेवा द्यावी आमदार शहाजीबापू पाटील

कोरोना  रुग्णांसाठी प्रशासनाने काटेकोरपणे सेवा द्यावी - आमदार शहाजीबापू पाटील

कोरोना  प्रादुर्भाव व कोरोना बाधित रुग्ण याबाबत तातडीची आढावा बैठक संपन्न

सांगोला दि.२८(क.वृ.): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सांगोला तालुक्यातील सर्व प्रशासन चांगले काम करत आहे,परंतु तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या तक्रारी येत असल्यामुळे काल दिनांक 27 रोजी तातडीची आढावा व नियोजन बैठक आयोजित केल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी बैठकीमध्ये दिली.या बैठकीसाठी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले,तहसीलदार योगेश खरमाटे, गट विकास अधिकारी संतोष राऊत, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सीमा दोडमणी, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ पूजा साळे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता दिनेश परदेशी, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, यांच्यासह माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ,डॉक्टर संघटनेचे प्रतिनिधी डॉ अमर शेंडे, डॉ शिवराज भोसले हे उपस्थित होते.
मेडशिंगी  येथील कोरोना  रुग्णालयामध्ये प्राथमिक सोयी  पुरवण्यासह सर्व प्रकारची स्वच्छता ठेवणे, रुग्णांना चांगले भोजन देणे व लक्षण नसणाऱ्या रुग्णांना प्राथमिक उपचार देणे, त्यांसोबत याठिकाणी खाटांची संख्या वाढवून ऑक्सीजन सिलेंडर ची सोय करणे, यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात यावे व रुग्णांना उत्तम प्रकारची सोय उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या रुग्णांना जे खाजगी डॉक्टर सेवा देणारे आहेत त्यांच्यासाठी किट,N ९५ मास्क, हॅन्ड ग्लोव्हज,  सॅनिटायझर  भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिल्या आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments