लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे - दीपक आबा साळुंखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
सांगोला दि.२८(क.वृ.): साहित्य क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करून गरीब उपेक्षित कष्टकऱ्यांचे कामगारांचे दुःख जगासमोर मांडणारे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना देशातील सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली.
यासंदर्भात मागणी करण्याची विनंती महात्मा फुले सूतगिरणीचे संचालक अभिषेक कांबळे यांच्यासह सांगोला तालुक्यातील मातंग समाजातील युवकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कथा ,कादंबऱ्या,नाटके,पोवाडे लिहिले त्यांच्या साहित्याचे अनेक परदेशी भाषांमध्येही रूपांतर झाले व रशिया या देशांमध्ये त्यांना पुरस्कारही देण्यात आला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्याच्या माध्यमातून मोठी लोकचळवळ उभी केली व कष्टकरी कामगारांसाठी आपलं आयुष्य दिलेलं आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही असे गौरौवउद्गार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे २०२० हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांना देशातील सर्वोत्तम भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
0 Comments